Ad will apear here
Next
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’


मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला बळकटी मिळेल’, असे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी सांगितले.

आमदार डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड, भाजप ठाणे विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह, आमदार अतुल सावे, जगदीश मुळीक उपस्थित होते. या वेळी अकोल्याचे नगरसेवक गोपी महादेवराव ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

फडणवीस म्हणाले, ‘निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे लोकप्रिय व अजातशत्रू नेते होते. त्यांनी तीन दशके काम केले. तीच परंपरा निरंजन डावखरे चालवत असून, ठाणे–कोकण भागातील ते धडाडीचे नेते आहेत. गेली सहा वर्षे विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे करू. केंद्रीय समितीकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळेल व आगामी निवडणुकीत ते चांगल्या मतांनी निवडून येतील.’

दानवे म्हणाले, ‘निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती. भाजप एकामागोमाग निवडणुका जिंकत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीने भाजपचा विजय निश्चित असून, त्यामुळे कोकणात भाजप अधिक बळकट होईल.’

डावखरे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे काम चालू आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZMRBO
Similar Posts
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
‘प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असून, या कालावधीत भाजपला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी मुंबई : राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सरपंचपदे जिंकून भारतीय जनता पक्षाने पुन्हा पहिला नंबर मिळवला आहे. या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language